मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने नुकतीच एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. यावेळी तिने आनंद व्यक्त करताना सांगितले की तिच्या यूट्यूब चॅनलला नुकतेच सिल्व्हर बटण मिळाले आहे. यासंदर्भातला व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर देखील पोस्ट केला आहे. या बातमीनंतर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. व्हिडिओ शेअर करताना सुनीता यांनी एक गोड कॅप्शन देखील लिहिले आहे. तसेच, यावेळी तिची मुलगी टीना आहुजा देखील तिच्यासोबत दिसली.
सुनीता आहुजाच्या यूट्यूब चॅनलला सिल्व्हर बटण
सुनीता आहुजा बरेचदा आपल्या चाहत्यांसोबत तिचे सुख दु:खाचे क्षण शेअर करत असते. नुकतेच तिने गोविंदासोबतच्या तिच्या नात्याबद्दलही उघडपणे सांगितले, तर आता तिने तिच्या यशाबाबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे. सुनीता आहुजाने लिहिले, “धन्यवाद, माझ्या यूट्यूब चॅनलला सिल्व्हर बटण मिळाले आहे, पण मला सोने, चांदी नको आहे, मला प्रेम हवे आहे.”
सुनीता आहुजाने व्हिडिओ शेअर केला
सुनीता आहुजाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती हातात सिल्वर बटण धरलेले दिसत आहे. हे बटण मिळाल्याने ती खूप खुश दिसते. ती कॅमेऱ्यासमोर तिच्या सिल्वर बटणावर लक्ष केंद्रित करत आहे. हा व्हिडिओ आणि तिचा आनंद पाहून तिचे चाहते देखील खूप खुश आहेत आणि कमेंट करत आहेत.
सुनीता आहुजावर कौतुकाचा वर्षाव
सुनीता आहुजाच्या पोस्टवर एका युजरने लिहिले, “अभिनंदन मॅडम.” दुसऱ्याने लिहिले, “आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा.” तिसऱ्याने लिहिले, “गोल्ड बटण देखील लवकरच येईल.” चौथ्याने लिहिले, “मनापासून अभिनंदन मॅडम.” त्याचप्रमाणे, लोक सुनीता आहुजाच्या आनंदात आनंदी आहेत. अनेकजण तिला छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
सुनीता आहुजा आणि गोविंदा यांचे नाते काही दिवस चर्चेत आहे. त्यांचा घटस्फोट होणार आहे त्यांनी त्यासाठी अर्ज देखील दाखल केला आहे अशा बातम्या समोर आलेला पण नंतर गणपतीवेळी दोघे एकत्र दिसले आणि वेगळे होणार नसल्याचे सर्वांना सांगितले.




